केज । प्रकाश मुंडे : जिल्हा प्रतिनिधी :- केज,माजलगाव ,धारूर, अंबाजोगाई तालुक्यात वर्चस्व असणारे खंबीर नेतृत्व मा. रमेशराव आडसकर यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. यामध्ये केज शहरातील बालासाहेब शेटे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
रमेश आडसकर यांच्या सोबत सतत सावलीप्रमाणे राहणारा, विश्वासू म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बालासाहेब शेटे हे केज शहरातील नामांकित व्यावसायिक असून सामाजिक क्षेत्रात आडसकर यांच्या नेतृत्वाखाली सतत सक्रिय असतात.
त्यांच्याकडे केज शहरातील जनता भावी नगरसेवक म्हणून ही पाहत असल्याचे पहावयास मिळत आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी सोशल मीडियाद्वारे फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले पुढील कार्य काळासाठी शुभेच्छा दिल्या.
रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली या पुढील काळातही असेच समाजीक व राजकीय क्षेत्रात आपण सदैव कार्यरत राहु व जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहु असे आमच्याशी बोलताना बाळासाहेब शेटे म्हणाले आहेत.

