प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- महाराष्ट्रात कोरोना या आजाराचे सध्या वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने नागरिकांना लसीकरणासाठी वयाची अट न लावता सरकट लस दयावी जेणे करूण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र सरकारला मदत होईल.यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्राकडुन परवाणगी घेवुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधक लस टोचावी अशी मागणी शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले,सध्या महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असुन देशात फक्त महाराष्ट्र राज्य हे रूग्णांच्या आकडेवारीत आघाडीवर असल्याचे दिसते.गेल्या वर्षाभरापासुन महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे.मागच्या वर्षी लाॅकडाऊन मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याचे दिसते.अनेक तरूणांच्या नोकरी रोजगार गेले.नविन नोकरी उपलब्ध होत नसल्याने कुठेतरी नाराजीचे निराशेचे प्रमाण समाजात वाढत आहे.गेल्या वर्षभर सरकारला पण कोरोनामुळे काही सुधारले नाही कारण लाॅकडाऊन मुळे महसुल घटला असल्याने याचा परिणाम राज्याचा विकासाकडे पण झाला आहे.
लोकप्रतिनिधींच्या निधीत पण कपात झाली.तसेच अनेक अडीअडचणी राज्यकर्त्यासमोर या वासुन उभ्या असताना आपन परत एकदा लाॅकडाॅऊनच्या दिशेने जात आहोत.सध्या एक महिना राञीचा लाॅकडाऊन जाहिर झाला आहे.शाळा बंदचे आदेश दिले गेले आहेत.प्रत्येक गोष्टीवर निर्ब॔ध लादण्यात आले आहेत.नागरिकांना पण काम नसल्याचे घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न उभा आहे.आपन मागच्या वर्षी बघितले रोजगार नोकरी गमावलेले तरूणांनी निराशेच्या भरात जिवनाचा शेवट केला असल्याचे दिसले.
यामुळे सरकारने प्रत्येक गरीब कुंटुबाला मोफत रेशन पुरवावे कारण उपासणार होणार नाही.तसेच मागच्या वर्षी सारखी वाईट परिस्थिती परत उभी राहु नये म्हणुण शासनाने लवकरात लवकर वयाचे कुठलेही बंधन न ठेवता विनाअट महाराष्ट्रात लसीकरण मोहिम युध्दपातळीवर राबवावी.सध्या शासनाने शाळा व इतर आस्थापना बंद ठेवल्या असल्याने यातील कर्मचारी वर्ग आरोग्यविभागाच्या मदतीला देवुन लॅपटाॅप,मोबाईलच्या माध्यमातुन नोंदणी करून लवकरात लवकर कोरोना लसीकरण मोहीम संपवावी जेणे करूण हा आजार फैलावण्यास प्रतिबंध बसेल.
लाॅकडाऊनचा निर्णय सरकार व जनतेला परवडणारा नसल्याने वयाची अट न लावता जास्त वेगाने लसीकरण महाराष्ट्र राज्यात राबवावे अशी मागणी शिव छावा शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदिप दरंदले पाटील यांनी केली आहे.

