shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेचर डिलाईट दूध प्रकल्पाच्या आग लागलेल्या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली भेट.

नेचर डिलाईट  दूध प्रकल्पाच्या आग लागलेल्या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली भेट.!!




इंदापूर प्रतिनिधी: कळस येथील नेचर डिलाईट दूध प्रकल्प, बाटली आणि पशुखाद्य कंपनीतील युनिटला  (दि.२३) दुपारी अचानक आग लागली. ही घटना समजताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या  ठिकाणची परिस्थिती पाहून नेचर डिलाईट च्या संबंधित आधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी इंदापूरचे पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिलीप पवार,मिलिंद कौलगी व इतर प्रमुख उपस्थित होते.


  नेमकी  आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र आगीत दूध प्रकल्पाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी सबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारल अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.या घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणासही अपघात झाला नसला तरी  नेचर डिलाईट डेअरी दूधप्रकल्पाचे अर्थिक मोठं नुकसान झाले असून संबंधित इन्शुरन्स कंपन्या कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पंचनामा महत्वाचा असल्याने पाटील यांनी प्रशासनास तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

close