पाटस आणि इंदापूर टोल नाक्यावर लोकल पाससाठी भेदभाव -शिवसेनेचा आरोप
इंदापूर प्रतिनिधी: ( दि.२२ मार्च). पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या टोलनाक्यांपैकी पाटस टोलनाक्यावर लोकल गाड्यांसाठी १००रु चा पास दिला जातो आणि तोच पास इंदापूरकर यांसाठी २७५ रु ला दिला जातो याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी टोल नाक्यावरील ऑफिस गाठले.
एरवी शांत असलेले हे शिवसेना पदाधिकारी टोल ऑफिसला पोहचताच आक्रमक झाल्याचे दिसून पाटस प्रमाणेच इंदापूर टोल नाक्यावर सुद्धा लोकल पास हा १०० रु लाच मिळाला पाहिजे,यासाठी एकाच महामार्गावरील दोन टोल मध्ये असा भेदभाव कशाकरिता?? असा सवाल तालुका प्रमुख यांनी संबंधित अधिकारी यांना केला. इंदापुरातील लोकल गाड्यांना सुद्धा १०० रुपये प्रमाणे टोल आकारणी करावी साठी निवेदन देण्यात आले.
लोकल टोल भाडे कमी करण्याच्या विषया बरोबरच शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांनी टोल अधिकारी यांना सूचना दिली की, कोरोना पेशंट असेल किंवा इतर पेशंट असेल त्यांची गाडी रांगेत उभा न करता त्वरित हॉस्पिटलच्या कामी जाण्याकरिता सोडण्याची व्यवस्था व्हावी , यावर तेथील अधिकारी म्हणाले की याकरिता आम्ही सेप्रेट लाईन केलेली आहे व तरीही असे काही निदर्शनास आले तर आम्ही त्या गाडीला त्वरित सोडण्याची व्यवस्था करू असे अधिकारी म्हणाले.
या वेळी तालुका प्रमुख नितीन शिंदे ,जेष्ठ नेते भीमराव आप्पा भोसले,जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे, उपजिल्हाप्रमुख संजय भाऊ काळे, मेजर सोमवंशी शहर प्रमुख, दूर्वा शेवाळे पश्चिम महाराष्ट्र माथाडी कामगार,सुदर्शन तात्या साखरे,इंदापूर तालुका उपप्रमुख हेमंत राजे भोसले, उपविभाग प्रमुख अंकुश गलांडे, विभाग प्रमुख बंडू शेवाळे, उपशहर प्रमुख राजाभाऊ शेवाळे व शिवसैनिक उपस्थित होते.

