माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या केज तालुका अध्यक्ष पदी केज येथील अजय भांगे यांची निवड करण्यात आली असुन महासंघाच्या मुंबई येथील कार्यालयात तशी घोषणा करण्यात आली व निवडीचे पत्र अजय भांगे यांना दिले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी निवड केल्यानंतर अजय भांगे यांना जास्तीत जास्त सभासद जोडण्यासाठी तसेच पारदर्शक पणे भ्रष्टाचार निर्मुलनासाठी कार्य करावे यासाठी शुभेच्छा दिल्या .
आपला भाग हा भ्रष्टाचार मुक्त करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे अजय भांगे यांनी सांगितले .
केज शहरातील फुलेनगर भागातील अजय भांगे हे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात त्यांच्या निवडीचे अनेक मान्यवर मंडळींनी स्वागत केले आहे.

