shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून आमदार कानडे यांनी दिलेला शब्द पाळला..!


देवळाली प्रवरा - दि. ५ मार्च २१
श्रीरामपूर विधानसभेचे विद्यमान आमदार लहुजी कानडे साहेब यांनी आज विधानसभेत देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याचा प्रश्न उपस्थित करून दिलेला शब्द  खरा केला त्याबद्दल आप्पासाहेब ढुस यांनी आमदार कानडे यांना दूरध्वनी करून आभार व्यक्त केले. 

 पुरवणी मागण्या वरील चर्चेत काल विधानसभेत बोलताना आमदार कानडे श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न पोट तिडकीने मांडताना दिसले. त्याबद्दल आमदार साहेबांना दूरध्वनी करून  देवळाली प्रवरा सह ३२ गावांच्या प्रश्नाकडे ढुस यांनी लक्ष वेधले होते. 

देवळाली प्रवरा साठी स्वतंत्र पोलीस ठाणेस मंजुरी, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील  भुयारी मार्ग,  तसेच नागरपालिके मागील आणि प्रसादनगर झोपडपट्टी धारकांच्या जागेचा प्रश्न,  एसटी स्टँड, आणि   तुकडेबंदी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर आमदार लहुजी कानडे साहेब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावेत अशी विनंती ढुस यांनी केली होती.

विधानसभेत पुन्हा बोलण्याची संधी मिळाली तर वरील सर्व प्रश्न नक्की उपस्थित करील अशी ग्वाही आज सकाळी आमदार लहुजी कानडे यांनी आप्पासाहेब ढुस यांचेशी दूरध्वनीवर बोलताना दिली होती. त्याप्रमाणे आज  देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे बद्दलचा प्रश्न मांडून दिलेला शब्द खरा केला त्याबद्दल आप्पासाहेब ढुस यांनी आमदार कानडे साहेबांचे आभार व्यक्त केले.  व पुन्हा बोलण्याची संधी मिळाल्यास ग्रामीण रुग्णालयासह उर्वरित प्रश्न उपस्थित करणेची विनंतीही ढुस यांनी केली.
close