shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीज जोड तोडणी विरोधात बावडा येथील शेतकरी आक्रमक...

वीजजोड तोडणी विरोधात बावडा येथील शेतकरी आक्रमक...

बावडा प्रतिनिधी : बावडा व परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत वीज जोडणी तोडल्याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांकडून ऐपतीप्रमाणे वीज बिल भरून सोडविण्यात आलेले  रोहित्र पुन्हा जोडण्यात आले आहेत.

यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी एक वीज बिलाचा हप्ता भरला आहे. अशा शेतकऱ्यांची ही वीज तोडण्यात आली होती. यामुळे शेतकरी आक्रमक झाला होता.ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी हप्ता भरला आहे. अशा शेतकऱ्याकडून लगेच दुसरा हप्ता घेऊ नये त्याचबरोबर ज्या रोहित्र मध्ये पन्नास टक्के वीज बिल भरणा होईल अशाही रोहित्र चालू करण्यात याव्यात व ज्या रोहित्रवर पन्नास टक्केही वसुली होणार नाही. अशा रोहित्र फक्त दोन तास दररोज पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी वीज देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली होती.

या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही नसल्याने यामध्ये सूट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या संबंधित शिष्टमंडळाने केली.

यावेळी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता कोरडे साहेब यांनी सांगितले की, आम्ही आपल्याला सॉफ्ट कॉर्नर देऊ पण काहीच भरणार नाही असे चालणार नाही आपापल्या ऐपतीप्रमाणे व बिलाच्या रकमेच्या प्रमाणे तीस ते पस्तीस टक्के रक्कम आपण भरावी एकूण ५० टक्के जरी वसुली झाली. तर ती रोहित्र आपण चालू करू, शासनाच्या कृषी धोरणाला अनुसरूनच येत्या दोन-तीन दिवसात आपण सर्व गोष्टी सुरळीत करू असे आश्वासन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
close