लग्नबंध हे स्वर्गातच बांधले जातात आणि भूतलावर त्याचे विविधत संबंध जोडले जातात. हा समज समाजात प्रचलित आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहाने १५ मार्च २०२१ रोजी गोवा येथे संजना गणेशन या टिव्ही अंकरशी विवाह केला. संजना गणेशन एक प्रसिद्ध टिव्ही अँकर असून गेले अनेक दिवस या दोघांचे प्रेमसंबंध होते. परंतु या दोघांनी कोणताही गवगवा न करता आपल्या प्रेमसंबंधाला कायदेशीरपणे विवाह बंधनात रूपांतरीत करून आपल्या नवीन वैवाहीक जीवनाला सुरूवात केली.
लग्न कोणी कोणाशी करायचे, त्याचा व्यवसाय काय असावा हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. परंतु क्रिकेटपटूंनी सिने चित्रतारका, डॉक्टर, पत्रकार, वकील, इंजिनियर तसेच इतर व्यवसायातील महिलांशी लग्न केल्याचे अनेक प्रसंग आपण बघितले आहेत. परंतु टिव्ही अँकरशी विवाह करणाऱ्या खेळाडूंचे प्रमाण अतिशय कमी आहे. प्रस्तुत लेखात आपण टिव्ही अँकरशी लग्न करणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ या.
भारताकडून ६ कसोटी, १४ वनडे व ३ टि २० सामने खेळलेला अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने सुप्रसिद्ध स्पोर्टस अँकर मयंती लँगर हिच्याशी सन २०१२ मध्ये लग्न केले. मयंती निव्वळ क्रिकेट सामन्यांसाठीच टिव्ही अँकरींग करत नसून सन २०१० च्या फिफा फुटबॉल विश्ववचषकासाठी ईएसपीएन या क्रिडा वाहीनीसाठी प्रसारण केले होते. त्या शिवाय सन २०१० च्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेदरम्यान मयंतीने अँकरींग केली होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने सुप्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर ली फरलाँग हिच्याशी सन २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. आपणास माहिती आहे की हा शेन वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा शिलेदार होता. सन २०२० उत्तरार्धात त्याने सक्रिय क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती स्विकारली आहे.
न्यूझिलंडचा सलामीचा फलंदाज मार्टीन गप्टील याने स्पोर्ट्स अँकर लारा मॅकगोल्ड्रीक हिच्याशी सन २०१४ मध्ये विवाह केला. लारा मॅकगोल्ड्रीक ही केवळ टिव्ही अँकरच नसून सिने अभिनेत्रीही आहे. शिवाय लारा मॅकगोल्ड्रीक हिने टिव्ही पत्रकार म्हणूनही काम केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटींग याने स्पोर्ट्स अँकर एरिन हॉलंड हिच्याशी या वर्षीच लग्न केले असून एरिन हॉलंडने पाकिस्तान सुपर लिगमध्येही अँकरीग केली आहे.
जसप्रित बुमराहाशी लग्न करणारी संजना गणेशन ही २८ वर्षीय क्रिकेटची अँकर व प्रेझेंटर म्हणून ख्यातनाम ती स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयपीएलशी निगडीत आहे.याशिवाय ती ने २०१९ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही अँकरींग केली आहे. याशिवाय संजना आयपीएल फ्रॅंचाईजी कोलकाता नाईट रायडर्सची देखील अँकर होती. सन २०१३ मध्ये संजनाने " फेमिना गॉर्जियस " हा किताबही जिंकला आहे.
बुमराहा व संजना हे विवाहापूर्वी कधीही सार्वजनिकरित्या प्रसिद्धीच्या झोतात एकत्रपणे आले नाहीत. त्यांनी आपले प्रेमसंबंध कधीही जगजाहीर होऊ दिले नाहीत. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सन २०१४ च्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संजनाने पुणे विद्यापिठातून इंजिनियरींगची पदवी घेतली असून एमटीव्हीच्या रियालिटी शो स्पिलिट्स व्हिलामधून आपल्या करियरला सुरुवात केली होती.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

