shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात लॉक डाऊन ला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद..!!

ना आडवाआडवी करण्याची गरज ना लाठीचा चा प्रसाद  देण्याची गरज...


केज / प्रकाश मुंडे  :- यापूर्वीच्या झालेल्या लॉकडाऊन मध्ये ज्याप्रमाणे वाहतूक शाखेचे  पोलीस बंधू चौकाचौकात उभे राहून वाहने अडवून चौकशा करण्याचे जे प्रमाण होते ते आज अत्यंत अल्प प्रमाण आज पहावयास मिळाले.



सर्व बाजारपेठा बंद असून रस्त्यावर शुकशुकाट होता जिल्हाधिकारी  मा रवींद्र जगताप  यांच्या आदेशानुसार सर्व बाबींची काळजी घेतलेली दिसत होती. बाजारपेठा, दुकाने बंद असल्यामुळे शुकशुकाट तर होताच परंतु जनतेने ही लॉकडाऊन मनावर घेतलेले पहावयास मिळाले. सर्व औषध दुकाने, दवाखाने चालू असलेले पहावयास मिळत होते. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, इतर कार्यालयात जाणाऱ्या लोकांना ओळखपत्र दाखवून जाण्याची मुभा होती.  

चौका-चौकात पोलीस बंदोबस्त असून त्यांना मदत करण्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान, नगर पंचायतचे कर्मचारी, पंचायत समिती व महसुलचे कर्मचारी सोबत आहेत. तसेच तालुक्यात लॉक डालऊनची अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, केज पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रदीप त्रिभुवन, संतोष मिसळे, दादासाहेब सिद्धे, श्रीराम काळे, युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे दहिफळे, विजय आटोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले, त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.

close