घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत घटनास्थळी..
केज / प्रकाश मुंडे :-
तालुक्यातील जानेगाव येथील श्रीमती अशाबाई अनुरथ चटप 38 वर्ष या महिलेचा दिनांक 25 रोजी रात्री घरापासून काही मीटर अंतरावर छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. याचबरोबर उस्मानाबाद येथून डॉग- स्कॉडला पाचारण करण्यात आले होते,
सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन केज येथे उपजिल्हा रुग्णालयात न करता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात करण्यासाठी पाठविण्यात आले.
घटना घडल्यानंतर शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते,सदरील घटना घडल्यानंतर पूर्ण गाव भयभीत झालेले पाहावयास मिळाले. सर्व गाव रात्रभर जागे होते.
मृत महिलेच्या वडिलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा रजिस्टर क्रमांक 48/ 2021,भा द वि 302 व 2010प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत


