पिंपरी चिंचवड:-शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. सुलभाताई उबाळे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेतर्फे गणेशनगर दापोडी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. मधुमेह तपासणी, नाडी तपासणी, फिजोथेरपी, तापमान तपासणी, रक्तदाब तपासणी,दंत तपासणी, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघे दुखी ह्या तपसण्या करण्यात आल्या.ज्येष्ठ नागरिक राम भाऊ शिंगोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळेस शिवसेना पिंपरी महिला अध्यक्ष सौ. सरिताताई साने, नगरसेवक राजू बनसोडे, युवतीसेना प्रतीक्षा घुले, विभागसंघटिका शैलाताई निकम,सौ. शीलामामी जाधव,मनोज वाखारे,मैत्री ग्रुप चे रवी कांबळे, अक्षय गायकवाड,अविनाश जाधव,बाळा लांडे,शिवा काची, रवी नगरकर,संजय पिंपळे,शिवराज डिग्गीकर,दीपक शिंदे मनोज काची, चिंचपा निंगडोळे, बुद्धीसागर गायकवाड, महेश बोधले,शहाजी वायदंडे, अजय कदम, उपस्थित होते.डॉ . सबा खान (तज्ञ डॉक्टर)
डॉ. अर्पिता परमार (दंत तज्ञ)
डॉ. प्राजक्ता शिंदे ( फिजोथेरेपिस्ट)
अल्फ्रेड अॅन्थोनी
प्रतिक्षा माचकर ( लॅब टेक्निशियन)
रोशनी जैन ( लॅब टेक्निशियन)
शबनम शाह ( लॅब टेक्निशियन) ह्यांनी सर्व तपासण्या केल्या. कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभाग संघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.

