shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन पुणे जिल्ह्यात कोरोना वाढतोय 2 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय – अजित पवार


पुणे:-पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे 1 तारखेपासून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांनी सर्व कार्यक्रम खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. तर, 1 किंवा 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. सात दिवसांतील रुग्णसंख्या पाहून नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.


पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री पवार यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागीलवर्षीपेक्षा जास्त पटीने रुग्णवाढत आहेत. 25 टक्क्यांचे पॉझिटीव्हीचे प्रमाण आहे. लग्नाला 50 पेक्षा जास्त संख्या ठेवायची नाही. 20 लोकांमध्ये अत्यंविधी करावा. शाळा, महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सार्वजनिक उद्याने, बागबगीचे सकाळी चालू राहतील. मॉल, मार्केट, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक बस सेवा सुरु ठेवली जाणार आहे. नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर 1 एप्रिलपासून सुरु केली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
close