shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी वडापुरी( इंदापूर) येथील धम्मान्वय भिमराव चंदनशिवे या विद्यार्थ्याने केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये केले यश संपादन..!!

विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी  वडापुरी( इंदापूर) येथील धम्मान्वय भिमराव चंदनशिवे या विद्यार्थ्याने केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये केले यश संपादन..!!

इंदापूर प्रतिनिधी:वडापुरी येथे विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी  वडापुरी( इंदापूर) येथील धम्मान्वय भिमराव चंदनशिवे या विद्यार्थ्याने केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून प्रवेश मिळवला. त्याबद्दल  इंदापूर तालुक्यातून त्याचे विशेष कौतुक होत आहे. या विद्यार्थ्याने लॉकडाउन काळातील सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या वडापुरी येथील विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी मध्ये अकॅडमी चे संस्थापक प्रा. कुणाल काळे सर यांच्या मार्गदर्शनातून अभ्यास करून या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून आपला प्रवेश निश्चित केला आहे. चंदनशिवे हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून त्याने  केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालया मध्ये इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षेत प्रवेश मिळवला विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी मध्ये काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  अभ्यास करून   या विद्यार्थ्याने जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळवलाआहे.  त्याबद्दल अकॅडमीचे प्रमुख प्रा. कुणाल काळे सर यांच्या वतीने या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 यावेळी सौ चंदनशिवे, अकॅडमीच्या संचालिका अलका काळे, दैनिक सकाळचे वडापुरी चे वार्ताहर आदम पठाण व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रा.कुणाल काळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धम्मान्वय भिमराव चंदनशिवे हा विद्यार्थी गेल्या काही महिन्यापासून विद्यानिकेतन सायन्स अकॅडमीत अभ्यास  अतिशय प्रामाणिक पणे  करून या विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरावरच्या जवाहर नवोदय विद्यालय यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जी पात्रता परीक्षा असते
 ती परीक्षा पास होऊन आई- वडील  यांच्याबरोबर वडापुरी गावाचे आणि विद्यानिकेतन सायन्स अकॅडमीचे ही नावलौकिक केले आहे. या वयात जिद्द आणि चिकाटी च्या जोरावरती अभ्यास करून आपले लक्ष साध्य करण्याचे खरे प्रयत्न केले आणि त्यातूनच हे यश या विद्यार्थ्यास मिळाले आहे. त्याचे मनापासून कौतुक वाटते त्याच्या पुढील शिक्षणास  अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

देशातील गुणवंत, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालय सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.
close