भाषा ही माणसे त्याच्या गरजेतून निर्माण केलेली आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, विचार, कल्पना व्यक्त करतो. भाषा हे संप्रेषणाचे प्रभावी माध्यम आहे. भाषा शिकण्यासाठी ती भाषा ऐकण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. कोणतीही भाषा लहान किंवा मोठी नसते. प्रत्येक माणसाला आपल्या बोलीभाषेचा अभिमान असतो. बोली भाषा टिकून राहण्यासाठी त्या भाषांची अस्मिता संबंधित समाजाला वाटली पाहिजे, तरच बोली भाषेला चांगले दिवस येतील.
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात विविध प्रकारच्या जातसमूहाचा विचार केला तर असे दिसून येते की भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये वडार समाज बोली भाषा संकलन करून टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही संशोधन करित असलेल्या मंडळींनी व्यक्त केले आहे.
बोली भाषेचा अभ्यास करताना असे लक्षात आले की अनेक भटक्या विमुक्त जाती व जमाती गुप्त आणि सांकेतिक शब्द वापरले जातात हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःची भाषा प्रत्येक व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची बाब आहे. बोली म्हणजे बोलण्यासाठी कामात येणारी एक भाषा नसते, तर बोलीत असतो एक इतिहास, संबंधित समाजाच्या जडणघडणीचा व त्याच्या गत- पाऊलखुणांचे उमटलेले ठसे दाखविणारा. बोली असते एक संस्कृती जी त्या बोलीभाषक समाजाच्या सण, समारंभ, उत्सव, लोकगीते, लोकसाहित्यातून समजून घेता येते. बोली संस्कार असते. जेव्हा एक बोलीभाषक व्यक्ती इतर कोणत्याही भाषक व्यक्तीशी संवाद साधत असतो. बोली भाषेत व्यक्त झाले नाहीतर एक दिवस भाषा संपतील आणि हे संपणे केवळ त्या बोलीचे नसेल, तर एका बोलीचा इतिहास, संस्कृती, संस्कार व जीवनशैलीचेही असेल हे ध्यानात घेतले पाहिजे.
वडार बोली भाषा गरज व महत्त्व लक्षात घेता लिपी बौध्द नाही. मौखिक परंपरेतून आलेली भाषेत उच्चारणाची एक स्वतंत्र ढब, लकब, लय, सुरावट, हेल व लहेजा आहे. केवळ लिहिलेले शब्द वाचून शिकतील असे वाटत नाही असे माझे मत आहे. वडार बोलींचे लीपिकरण होऊन ती बोली टिकेल हे रास्त वाटत नाही.,तर दैनंदिन व्यवहारात तिचा वापर होणे व तो वापर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने सुपूर्द होत जाणे तितकेच गरजेचे आहे.
प्रा. दिलीप आ .जाधव
रयत शिक्षण संस्थेचे ,महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा .

