shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" कोरोना प्रतिबंधाष्टक "


आता जाणावे सर्वांचे हीत
विनाकारणे न पसरावे चित्त
बैसौनी वर्तावे आपुल्या घरांत
रोगप्रसार टाळण्या !! १ !!

वेळ साधोनी करा बातचीत
अंतर ठेवोनी तिन हात
नमस्काराची पाळावी रीत
रोगप्रसार टाळण्या !! २ !!

वेळोवेळी धुवोनिया हात
नाकतोंड झाका रूमालांत
आग्रहे पाळावे ऐशा व्रतास
रोगप्रसार टाळण्या !! ३ !!

रोग टाळण्या बैसता घरांत
धर्मपत्नीचे जपावे हीत
उठता बसता करावी मदत
रोगराई टाळण्या !! ४ !!

प्रातः काळी जोडोनिया हात
स्मरण करावे परमेश्वरास
योग व्यायाम करावे एकचित्त
रोगराई टाळण्या !! ५ !!

आले आहे विषाणू संकट
कामे उरकावी झटपट
आळसाचा नसावा दिनपट
रोगराई टाळण्या !! ६ !!

वनौषधींचे गुणदोष जाणोनी
काढा प्यावा एकत्र बैसोनी
कुटूंब हितास्तव ऐशी करणी
रोगराई टाळण्या !! ७ !!

ऐसे केलीयाचे फळ
रोग कोरोना स्वयेची पळेल
कुटूंब निरोगी स्वास्थ्य टिकेल
रोगराई टाळता !! ८ !!

इतिश्री चंद्रकांत शहासने विरचीतं कोरोना रोगराई प्रतिबंधात्मक वर्तनाष्टकं संपूर्णम् !!

रचनाकार : चंद्रकांत शहासने
देशभक्तकोशकार, पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५
close