shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओसिसिआय'', वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र, करमाळा महिला तालुकाध्यक्ष पदी सौ.रुपाली ननवरे यांची निवड..!


सोलापूर । प्रतिनिधी:
आज दिनांक 26/032021रोजी करमाळा , सोलापूर येथे ओसिसिआय(वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र) सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश नन्नवरे यांच्या संयोजनातून ओसिसिआय जिल्हा कार्यकारिणीची बैठक अतिशय उत्साहात समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. राज्य तसेच देशातील उपेक्षित समाज बांधवाना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या ओसिसिआय संघटनेने महाराष्ट्र राज्यात ऐक्याची दृष्टीने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. 

यावेळी करमाळा महिला कार्यकारिणीची निवड ओसिसिआयचे  श्री. गोविंद तांदळे, प्रदेश सरचिटणीस ओसिसिआय यांनी जाहिर केल्या. निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांचे या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना गोविंद तांदळे म्हणाले की ओड कम्युनिटी कॉऊंशिल ही राष्ट्रीय वडार संघटना महाराष्ट्रातील अनेक लोकानी , त्यांच्या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातुन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पण ज्या वडार समाजाने राज्य उभारणीत अविस्मरणीय योगदान देऊनही अजुन समाजाला न्याय मिळू शकला नाही.
 
त्यामुळे समाज हिताचा,उपेक्षीत समाजाला न्याय मिळवुण देण्यासाठी ओसिसिआय या राष्ट्रीय संघटनेच्या  माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांना, तरुणांना घेऊन येणा-या काळात निर्णायक न्यायीक लढा उभा करेल. ही संघटना समाजाचे जटील झालेले संविधानीक आरक्षणाबरोबर इतर प्रश्नावर चळवळ उभी करत असताना समाजाचे ग्राऊंड लेवलचे प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी तरुणांच्या सोबत ग्राऊंड लेवलला प्रामाणिकपणे काम करायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे समाज बांधवांसाठी ही संघटना अन्याय, अत्याचार विरोधात लढा उभारेल.

यावेळी धडाडीच्या कार्यकर्त्या सौ. रुपाली सागर नन्नवरे यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करून "ओसिसिआय" च्या‌ करमाळा महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
close