shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"ओसिसिआय'' वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र " जिल्हा कार्यकारिणीची करमाळा ', सोलापूर येथे उत्साहात बैठक संपन्न..!

सोलापूर । प्रतिनिधी :- आजदिनांक 26/032021रोजी करमाळा , सोलापूर येथे ओसिसिआय(वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र) सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश नन्नवरे यांच्या संयोजनातून ओसिसिआय जिल्हा कार्यकारिणीची बैठक अतिशय उत्साहात समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.  

राज्य तसेच देशातील उपेक्षित समाज बांधवाना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या ओसिसिआय संघटनेने महाराष्ट्र राज्यात ऐक्याच्या दृष्टीने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. यावेळी    करमाळा महिला कार्यकारिणीची निवड ओसिसिआयचे श्री. गोविंद तांदळे , प्रदेश सरचिटणीस ओसिसिआय यांनी जाहिर केल्या. निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांचे  या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना गोविंद तांदळे म्हणाले की ओड कम्युनिटी कॉऊंशिल ही राष्ट्रीय वडार संघटना महाराष्ट्रातील अनेक लोकानी,ज्यांच्या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातुन समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

पण ज्या वडार समाजाने राज्य उभारणीत अविस्मरणीय योगदान देऊनही अजुन समाजाला न्याय मिळु शकला नाही.त्यामुळे समाज हिताचा,उपेक्षीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ओसिसिआय या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांना, तरुणांना घेऊन येणा-या काळात निर्णायक न्यायीक लढा उभा करेल. ही संघटना समाजाचे जटील झालेले संविधानीक आरक्षणाबरोबर इतर प्रश्नावर चळवळ उभी करत असताना समाजाचे ग्राऊंड लेवलचे प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी तरुणांच्या सोबत ग्राऊंड लेवलला प्रामाणिकपणे काम करायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. समाज बांधवांसाठी ही संघटना अन्याय, अत्याचार विरोधात लढा उभारेल.असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

निवडी करणेत आलेले महिला मान्यवर खालील प्रमाणे आहेत. 
सौ. रुपाली सागर नन्नवरे ,  --- महिला तालुकाध्यक्ष करमाळा "ओसिसिआय "
मिना आबासाहेब माने कार्याध्यक्ष 
कविता फुलचंद आलाकूंटे
संपर्क प्रमूख करमाळा 
उषाताई संजय मुरकुटे 
उपाध्यक्ष 
मधुमती रेवननाथ धोत्रे 
उपाध्यक्ष 
रूपाली संतोष मुरकुटे 
सरचिटणीस 
माधुरी बाळासाहेब विटकर 
खजिनदार 
अश्विनी संतोष सुरवसे 
चिटणीस 
उलका विकास वेताळ 
सचिव 

यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री गोविंद तांदळे, प्रियदर्शनी चव्हाण महिला युवा संघटक, 
जिल्हाध्यक्ष प्रकाश नन्नवरे मांगी युवा नेते आदेश बागल आदींनी आपले मनोगते  व्यक्त केले.या कार्यक्रमास आबा माने, संतोष चौगुले, राजेंद्र मुरकुटे, जनाबाई सुरवसे, शेवंता सुरवसे, कविता आलाकूंटे, शांताबाई वेताळ, रेखा नन्नवरे यासह तालुक्यातील विविध ठिकाणचे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत श्री शरद चौगुले यानी केले तर आभार सौ. रूपाली ताई नन्नवरे यांनी मानले.
close