नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
नगर शहराचे उपनगर केडगाव येथील माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष महाराज सुर्यवंशी यांचे दुखद निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्य समितीवर नुकतीच त्यांची निवड झाली होती. केडगावमध्ये धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळ्याचे गेल्या 20 वर्षा पासून आयोजन करत होते.ह्या वर्षी करोना प्रादुर्भावा मुळे त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी राहून अखंड हरिनाम चा 7 दिवस गजर केला. व पंढरपुर दिंडी आयोजनात त्यांचे मोलाचे योगदान होते.
आपल्या पहाडी आवाजातील किर्तनाने ते भाविकांना ते मंत्रमुग्ध करीत . त्यांच्या मागे पत्नि , मुलगा , मुलगी सुन, जावई नातवंडे, बंधू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

