प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : पोलीस अधीक्षक अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्वर थोरात, व पोलीस अमलदार यांनी टु प्लस मधील आरोपी यांचा मेळावा घेतला मेळाव्यादरम्यान सपोनि रामचंद्र कर्पे व ज्ञानेश्वर थोरात यांनी गुन्हेगारी क्षेत्र किती वाईट आहे हे सांगण्यात आले.
आपण कसं वागलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करून त्यांना भावी पुढील जीवन जगण्यासाठी सूचना देऊन योग्य मार्गदर्शन केले आहे सदर मेळाव्या दरम्यान पोलीस पाटील यांची पण बैठक घेऊन त्यांना पण अर्पिता आरोपींच्या ओळखी करून देण्यात आल्या या मेळाव्यादरम्यान पोलीस पाटील माकोणे व टु प्लस मधील आरोपी सागर कुसळकर यांनी गुन्हेगारी क्षेत्र किती वाईट आहे याबद्दल आपला अनुभव व्यक्त केला.
त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार संजय वाघ, पत्रकार मोहन शेगर पोलीस अंमलदार लबडे, चव्हाण, थोरात गर्जे, ठोंबरे, झिने, मोरे, माने, असे उपस्थित होते

