नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या गावात प्रहारचे शाखांचे उद्घाटन झाले आहे व होत आहे. प्रहार संघटना अपंग बांधव असो वा शेतकरी असो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असते.
प्रहार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय कार्य चांगल्या प्रकारे प्रविण पिंपळे करत आहे तसेच गेल्या चार पाच वर्षापासून गोरगरीबांचे वैद्यकीय बिल, शेतकरी बांधवांचे विज रोहित्र दुरुस्ती असेल, शालेय अडचणी असतील, किंवा विज बिल सवलत असेल अशा अनेक गोष्टी साठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने आणि आंदोलन करून नगर तालुक्यातील गुंडेगाव गणातील अनेक नागरीकांच्या मुलभूत समस्या वाचा फोडुन न्याया साठी झटणारा हा तरुण दिसत आहे.
या धडपड करणारा तरूण खरंच शेतकरी सर्वसामान्य माणसाचे हिताचे काम करत आहे. त्यांमुळे गुंडेगाव गणातुन पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी अपेक्षा वाटते.
शेतकरी सर्वसामान्य माणुस प्रविण पिंपळे कडे लोकप्रतिनिधी या नजरेने पाहत आहेत. सध्या नगर तालुक्यातील माजी- आजी लोकप्रतिनिधी पक्षांतर करत आहेत. आपली भाकरी कशी भाजेल याची व्यवस्था करत आहेत.पक्ष संघटन यांच्याशी प्रामाणिक पणे काम करणारे कार्यकर्ते यांना या वेळी संधी मिळणार का..? हा हि प्रश्न नविन तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहे.
प्रविण पिंपळे प्रहार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामात कायम अग्रेसर दिसत आहे.असा धडपड करणारा नवतरुण समाजकारण ८०% आणि राजकारण २०% करत आहे.
सर्व सामान्य कुटुंबातील तरुणाने पंचायत समिती निवडणूक लढवावी आणि आम्ही तडफदार काम करणा-या तरुणाला जर पक्षानं जरी तिकिट नाकारले तरी लोकवर्गणीतून उमेदवारी करुन अशा काम करणा-या तरुणाला लोकप्रतिनिधी बनवू असा ठाम निर्धार रुईछत्तीसी,राळेगण, गुंडेगाव,दहिगाव,शिराढोण,
साकत आदी गावातील शेतकरी असं खाजगीत सांगत आहेत.

