shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मोठा दिलासा..!!

अहमदनगर । प्रतिनिधी:-
“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम  तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत या प्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. संगमनेर सत्र न्यायालयाने यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

सदर वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती तर त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला आहे.
close