shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यासाठी हर घर जल योजनासाठी२४९ कोटी१७ लाख मंजूर -राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे..!!

इंदापूर तालुक्यासाठी हर घर जल योजनासाठी२४९ कोटी१७ लाख मंजूर -राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे..!!
इंदापूर प्रतिनिधी-इंदापूर तालुक्यासाठी हर घर जल योजनेतून जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाअंतर्गत रुपये २४९ कोटी १७ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दि १२ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील एकूण १४० गावांना रुपये २४७ कोटी १७ लाख रुपयांच्या संपूर्ण प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. या योजनेतून १४० गावातील ८५९ वाड्या वस्त्यांमध्ये ९२ हजार ५४९ कुटुंबांना प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक घरासाठी नळ द्वारे ५५ लिटर प्रति मानसी प्रतिदिन प्रमाणे शुद्ध पिण्याचे व घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेमुळे इंदापूर तालुका टँकर मुक्त होणार असल्याची माहिती  दिली.तसेच हर घर जल योजना ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी वरदान ठरणार असून शासनाने योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवली आहे .अनेक वर्षापासूनची पाण्या संदर्भातील समस्या मार्गी लागणार आहे.
close