shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Rekha Jare Murder Case I रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेला अखेर बेड्या.!

हैद्राबादमध्ये ठोकल्या बेड्या:
(Rekha Jare Murder Case Main Accuse Bal Bothe arrested from Hyderabad

अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले Murder Case यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या होऊन साडेतीन महिने उलटले तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार झाल्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली असतानाच अहमदनगर पोलीसांना त्याचा कसोशीने माग काढत शनिवारी भल्या पहाटे त्याला अखेर चार मिनार साठी प्रसिद्ध असलेल्या हैद्राबाद येथे सिताफीने व प्रसंगावधान राखून अटक केली आहे. 

यामुळे अहमदनगर पोलिसांची मान सध्या तरी उंचावली आहे. कारण रेखा जरे यांच्या हत्येनंतर साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

घटनाक्रम...!!
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रणरागिणी अध्यक्षा रेखा जरे यांचा काटा काढण्यासाठी अनेक यंत्रणा बाळ बोठे राबवत असतानाच तो अयशस्वी ही झाला. तेव्हा त्याने अखेरीला रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात  सुपारी देऊन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 
30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर सदर घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या महिलांनी व रुणाल जरे याने मारेकऱ्यांना  प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यांच्याच माहिती नुसार पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. पाच आरोपींची कसून चौकशी केल्यावर हत्याकांडात बाळ ज.बोठे मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आले होते. आरोपींनी हत्याकांड घडवून आणल्याचा जबाबाच्या वेळी बाळ बोठेने सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले होते. 

रेखा जरे खून प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ ज.बोठे विरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता. यामुळे सदर कारवाई करण्यासाठी अहमदनगर पोलीसांना यश मिळाले आहे. त्यामुळे अहमदनगर पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
close