shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांधावरील झुडपात लपवलेली अवैध देशी दारू पकडून दिली.

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील प्रकार 58 हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : गजानन एस. गिरे
सेनगाव तालुक्यातील पळशी गावालगत साबलखेडा शिवारात पळशी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यांनी गावात दारू मटका असे अवैध धंदे चालू देणार नसल्याचा पवित्रा घेतला असून यातच साबलखेडा शिवारात गावातील अवैध धंदे वाल्यांनी रोड लगत बांधाच्या झुडुपांमध्ये देशी दारूचे बॉक्स लपवुन विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली असता तात्काळ त्यांनी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली असता पोलीस आणि जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर खिल्लारे ,सरपंच शिवाजी वाबळे, उपसरपंच शंकर साळवे ग्रामपंचायत सदस्य सारंगधर बरडे, शिवशाही पॅनलचे जगन्नाथ पांढरे, बाळासाहेब देशमुख ,पिंटू रायवाडे, पिंटू अण्णा देशमुख, उत्तम बरडे, गोपाळ राऊत यांच्या मदतीने अवैध दारू पकडण्यात आली या मध्ये देशी दारूचे आठ बॉक्स पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या कार्यवाहीचे परिसरात जोरदार चर्चा चालू आहे
सध्या हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे देशी दारूची दुकाने बंद असल्याने चोरट्या मार्गाने चढ्या भावात दारू विकत असल्याची चर्चा आहे या कार्यवाहीत 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्या गोरेगाव परिसरात अवैध दारू विक्री आणि मटका जोरात चालू असल्याची जनतेतून दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे आणि आजच्या कार्यवाही ने त्यावर शिक्कामोर्तब झाल्यागत वाटत आहे यावेळी शिवसेना नेते जि प सदस्य नंदकिशोर खिल्लारे यांनी परिसरात अवैध धंदे चालू देणार नसल्याचे मत व्यक्त केले असून परिसरात सदर निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहे का साहेबराव राठोड हे करीत आहेत.


close