नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गणेश मंदिरात आरती
- अंगारकी चतुर्थी उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथिल नीरा भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदिरामध्ये मंगळवारी (दि.2) अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
अंगारकी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिरामध्ये अभिषेक, भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. माघ महिन्यामध्ये तब्बल 21 वर्षांनंतर प्रथमच अंगारकी चतुर्थी आली आहे. तसेच चालू मार्च महिन्यात दोन संकष्टी चतुर्थी आलेल्या आहे, असे कैलास गुरव यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, , दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
______________________________
फोटो:- नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावरील गणेश मंदिरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

