shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसादनगर भूमिगत गटार कामात असंख्य त्रुटी..!


राहुरी फॅक्टरी - देवळाली प्रवरा नगरपालिकेचे वतीने सुरू असलेल्या प्रसादनगर भूमिगत गटार कामाची आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेना शहर प्रमुख सुनीलभाऊ कराळे, राष्ट्रवादी शहर प्रमुख केदारनाथ चव्हाण, काँग्रेस चे वैभव गिरमे, व्यापारी असो. चे सुनील विस्वासराव आदींनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून आज पाहणी केली. 

 या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सौ रजनी कांबळे व कांतीलाल उल्हारे यांचेसह इतर स्थानिक नागरिकांनी भुयारी गटार पाईपलाईनच्या चेंबर तुंबने बद्दल आणि मुख्य गटार मार्गाची दिशा बदलणे सह कामात खडी चे प्रमाण कमी असलेबद्दल तक्रारी केल्या. 

ही पाहणी करताना फक्त सांडपाणी गृहीत धरून सिमेंट पाईप चा व्यास ठरविला गेला असून पावसाचे छतावर पडणारे पाणी विचारात घेतले गेले नसलेणे ही गटार योजना यशस्वी होऊ शकत नाही, भविष्यात चेंबर तुंबने सारख्या समस्यांना त्यामुळे येथील नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे, त्यासाठी मुख्य गटारीची पाईप बदलून जास्त व्यास असलेला पाईप टाकल्यास सर्व प्रश्न सुटतील असे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. 

शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील कराळे यांनी पीसीसी साठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मालात खडी कमी असल्याचे सांगून काम निकृस्ट होत असल्याचा आरोप केला व जर काम चांगले झाले नाही तर शिवसेना स्टाइल ने उत्तर देऊ असे सांगितले.

कामात सुधारणा करा नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करू असे राष्ट्रवादी चे शहर प्रमुख केदारनाथ चव्हाण व काँग्रेस चे वैभव गिरमे यांनी सांगितले.
close