shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश मोरे हत्याकांड प्रकरण..!!

  • प्रेत ताब्यात घेणार नाही पवित्रा घेत ग्रामस्थाचा पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या    
  •  5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल  4 जणांना अटक  ....!




केज / जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- संपूर्ण मोरेवाडी मध्ये संतप्त वातावरण असून आरोपीना अटक करे पर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत ग्रामस्थानी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या मांडला.     



दरम्यान गणेशचे वडील सुंदरराव मोरे यांनी अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन मध्ये 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन यातील चार अारोपिना  अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात मयत गणेश मोरे याचे वडील सुंदर महादेव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हंटले आहे की, दि 01/03/2021 रोजी सोमवारी सायंकाळी सात ते साडे सात वाजणेचे सुमारास मी घरी मोरेवाडी येथे असताना आमचे नातेवाईक अमोल उध्दवराव सुर्यवंशी रा मोरेवाड़ी यांनी फोन करुन सांगितले की, तुमचा मुलगा गणेश मोरे हा अंबाजोगाई केज रोडवरील बी टी मोरेनगर मोरेवाडी जाणारे रोडलगत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आहे असे सांगितले . यावरुन मी तात्काळ त्याठिकाणी गेलो असता तेथे रोडवर रक्त पडलेले होते व तलवार, विटा, दगड पडलेले होते, नतंर मला समजले की, मुलगा गणेश यास उपचाराकामी सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे अमोल उध्दवराव सुर्यवंशी, बालाजी भाऊसाहेब मोरे, राहुल गंगाधर मोरे, प्रमोद बद्रुवान


मोरे रा .मोरेवाडी व इतर यांनी निलेश जगदाळे यांधी अंबुलन्स बोलावुन त्याचे अॅंब्युलन्स मध्ये नेले  आहे. मी लगेच सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे गेलो व मुलगा गणेश यास पाहीले असता त्याचे तोडावर, डोक्यास दोन्ही हातावर शरीरावर गंभीर जखमा दिसुन आल्या व रक्त निघत होते. मुलगा गणेश हा काही बोलत नव्हता. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगा गणेश यास तपासुन तो मयत असल्याचे सांगितले. मी तेथील अमोल सुर्यवंशी यांना काय झाले होते असे विचारले असता त्यांनी हर्ष शांतीलाल इंगळे रा . जयभीम नगर मोरवाडी, उज्वल उत्तम दड़मारे रा विद्युत नगर अंबाजोगाई यांनी तलवार, विटा व दगडाणे गणेश यास मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जखमी करून  खून केल्याचे सांगितले.


सुमारे सहा ते सात महीन्यापुर्वी माझा मुलगा गणेश मोरे, पवन मोरे व इतर प्रतीक प्रदीप तरकसे यांनी मारहाण करन जातीवाचक शिवीगाळ केलेची तक्रार पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे दिलेली होती व त्यात मुलगा गणेश व त्याचे सोबतच्या इतरांची जामीन मिळालेला होता. नंतर प्रदीप तरकसे, प्रतिक प्रदीप तरकसे, रा मोरेवाडी अमोल लक्ष्मण पौळे, शांतीलाल इंगळे रा. अंबाजोगाई हे अधुन मधुन माझ्याकडे व मुलाकडे यायचे, मला व मुलगा गणेश मोरे यास दोन लाख दे, दिड लाख रुपये दे केस मिटवुन घेतोत तुझे मुलाचे नाव काढून घेतोत असे म्हणत तु पैसे नाही दिले व मिटवुन नाही घेतले तर तुला व तुझ्या मुलाला जिवे मारुन टाकु अश्या धमक्या देत होते. मी त्यांना सांगितले की कोर्ट काय निर्णय देईल तो मला मान्य आहे. असे सांगितले होते परंतु ते नेहमीच मला पैशाची मागणी करून धमकावत होते. त्याच कारणावरून मुलगा गणेश सुंदरराव मोरे वय 21 वर्ष, प्रदीप तरकसे, प्रतीक प्रदीप तरकसे, रा. मोरेवाडी अमोल लक्ष्मण पौंळे, याचे सांगण्या वरुन हर्ष शांतीलाल इंगळे रा जयभीम नगर मोरेवाडी, उज्वल उत्तम वडमारे रा विद्युत नगर मोरेवाडी अंबाजोगाई यांनी तलवार, विटा, दगडांनी तोंडावर, डोक्यावर दोन्ही हातावर इतर ठिकाणी मारहाण करुन त्याचा खून केला.

या प्रकरणी सुंदर मोरे यांच्या फिर्यादी वरून प्रदीप तरकसे , प्रतीक प्रदीप तरकसे, अमोल लक्ष्मण पौळे, हर्ष शांतीलाल इंगळे,  उज्वल उत्तम वडमारे यांच्या विरुद्ध

गु र न 92/2021 कलम 320, 120 ब नुसार गुन्हा दाखल केला असुन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नी. बालसाहेब पवार हे स्वतः करत आसुन चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.

close