shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पवना नदीमध्ये जलपर्नीमुळे डासांचे प्रमाण वाढले. नागरिक हैराण, युवासेनेने दिला आंदोलनाचा इशारा..!


पिंपरी चिंचवड:-पवना नदी मध्ये वाढत्या जलपर्णीमुळे डासाचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकां मध्ये रोगराई चे प्रमाण वाढत आहे.

नदीपात्रातील जलपर्णी काढून फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी परिसरात धूर फवारणी व औषधं फवारणी करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांना पिंपरी युवासेना व मैत्री ग्रुप च्या वतीने देण्यात आले. ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे पिंपरी विभागसंघटक निलेश हाके, रवी कांबळे, अक्षयदादा गायकवाड, दीपक साळवे, मोसीन मुजावर, अतुल जाधव, राजू तावस्कर उपस्थित होते.
close