shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अन्न व औषध प्रशासन विभागाचे पिंपरी चिंचवड परिसरात दोन ठिकाणी छापे..!!

पिंपरी चिंचवड:-अन्न व औषध प्रशासन विभागाने पिंपरी परिसरात दोन ठिकाणी छापे मारले. त्यात तीन हजार 70 रुपयांचा गुटखा, विमल पान मसाला आणि तंबाखूचे पाऊच जप्त केले आहेत.

पहिली कारवाई पिंपरी येथील जैन पेट्रोल पंपासमोर ख़ुशी जनरल स्टोअर्स येथे केली. त्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने एक हजार 200 रुपयांचा माणिकचंद गुटखा जप्त केला. विशाल प्रकाश पंडित (वय 35, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरी कारवाई खराळवाडी, कामगारनगर, पिंपरी येथे करण्यात आली. त्यात एक हजार 870 रुपयांचा विमल पानमसाला व तंबाखू जप्त केली आहे. याप्रकरणी विशाल मलाराम देवासी (वय 24, रा. खराळवाडी, कामगारनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
close