प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- स्ञी शिक्षणाच्या आघप्रणेत्या ज्ञानज्योती साविञीबाई ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी सोनई येथील यशवंत वाचनालयात साजरी करण्यात आली.यावेळी साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुण बोलताना सोनई पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक रामचंद्र करपे यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठाणचे सोनई येथील यशवंत वाचनालय राबवत असलेल्या गाव तेथे वाचनालय या उपक्रमाचे कौतुक केले.नेवासा तालुक्यात वाचनसंस्कृती वाढुन सुसंस्कृत समाज घडवण्यास या वाचनालयामुळे मदत होत आहे.साविञीबाई फुले यांच्यामुळे स्ञी शिक्षणाची चळवळ उभी राहिली.साविञीबाई फुले यांच्या मुळे आज आपल्या मुली शिकु शकल्या आणि आज विविध क्षेञात आज पुरूषाच्या बरोबरीने महिला काम करत आहेत.तसेच शिकलेली आई घरादाराला पुढे नेई या साविञींच्या विचाराने आजच्या महिला शिक्षण घेवुन नवसमाज निर्मितीचे काम करत आहेत.असे बोलताना करपे म्हणाले.
यावेळी सोनई पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे साहेब,जलसाक्षरता समितीचे सदस्य संदिप दरंदले,पञकार विजय खंडागळे,सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाभाभी कुमावत,पञकार मोहनजी शेगर,अशोक शिरसाठ टेलर,बाबा वाघमोडे,सचिन ठोंबरे,यशवंत वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल जयराम आगळे आदीसह प्रमुख उपस्थित होते.यावेळी साविञीबाई फुले यांच्या जिवन चरिञाचे विविध पैलु भाषणातुन प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी आभार संदिप दरंदले यांनी मानले.

