shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकल शिक्षक सेवा मंच इंदापूरच्यावतीने ४४ शिक्षकांना कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण..!

एकल शिक्षक सेवा मंच इंदापूरच्यावतीने ४४ शिक्षकांना कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण..!
एकल शिक्षक मंचाचा उपक्रम कौतुकास्पद - गटविकासअधिकारी विजयकुमार परिट.
 इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्यस्तरीय एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच इंदापूर शाखेच्या वतीने कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम पाळून कोविड काळात शैक्षणिक कामकाजाबरोबर कोरोना महामारी रोखण्यासाठी सर्व शासकीय आदेश पाळून विविध कामे करणाऱ्या तालुक्यातील ४४ शिक्षकांना कोविड योद्धा  २०२० - २०२१ व पुणे जिल्हा एकल शिक्षक मंचाचे वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या २ मुलींना सन्मानचिन्ह , प्रमाणपञ , मास्क , सॕनिटायजर , पुष्पगुच्छ देवून लोकनेते स्व शंकरराव पाटील सभागृह इंदापूर येथे गटविकासअधिकारी विजयकुमार परिट , गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे , वरकुटे खुर्दचे सरपंच बापुराव शेंडे , पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांचे हस्ते करण्यात आले.
 प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आले.कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.एकल शिक्षकांच्या मागणीचा शासन स्तरावर विचार झाला पाहिजे.बदलीमध्ये एकल शिक्षकांच्या सेवेचा विचार व्हावा.असे मत गटविकासअधिकारी विजयकुमार परिट यांनी व्यक्त केले.गटविकासअधिकारी विजयकुमार परीट व शिक्षक भारत बांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.गटशिक्षणाधिकारी राजकूमार बामणे , सरपंच बापुराव शेंडे , बाळासाहेब घोळवे , डाॕ उषा भोईटे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष संजय म्हस्के यांनी केले.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी आभार महिला अध्यक्षा सुप्रिया आगवणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस शांताराम रणवरे , कार्याध्यक्ष रतीलाल कुचेकर , कोषाध्यक्ष पंढरीनाथ ठवरे , जिल्हा कार्याध्यक्षा मनिषा ननावरे , शिक्षक सोसा व्हा चेअरमन वसंत फलफले , संचालक बालाजी कलवले , शशीकांत शेंडे , माजी चेअरमन सुनिल शिंदे , जुनी पेन्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे , माजी संचालक भारत ननवरे , राजेंद्र भोंग , रमेश बरळ यांनी प्रयत्न केले.शिक्षक उपस्थित होते.
close