नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील वाटेफळ या गावचे रहिवासी केतन साबळे यांनी पहिल्याच प्रयत्नात सी.ए परिक्षेत यश संपादन केले आहे. त्यांचे वडील विकास सेवा सोसायटी वाटेफळ चे चेअरमन सुरेश सिंदु साबळे व सौ.जयश्री साबळे यांचे ते चिरंजीव आहे.
केतन चे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा वाटेफळ गावी झाले.नंतर माध्यमिक शिक्षण रुईछत्तीसी येथील जनता विद्यालय या ठिकाणी झाले. या ठिकाणी शिक्षांणाचे बाळ कडु मिळाल्याने पुढं हि आपल्या शिक्षण घेऊन काहीतरी करायचं आहे.हे ध्येय केतन मनाशी बाळगु होता.
त्यांच ध्येय व उद्दिष्टे मुळे आज केतन सी.ए परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलेल्या या यशा बदल पंचायत समिती सभापती सौ.कांताबाई कोकाटे यांनी त्यांचा श्रीफळ फेटा बांधून सत्कार केला याप्रसंगी शिवसेना नेते इंजि.प्रविण कोकाटे, मा.सरपंच पांडुरंग कोकाटे, सह आयुक्त श्रीकांत कोकाटे, ग्रा.प.सदस्य विश्वसागर कोकाटे, चेअरमन सुरेश साबळे,प्राशत कांबळे, नानासाहेब कोकाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

