हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) दि.०५,हिंगोली जिल्हयातील सेनगांव तालुक्यातील लिंगदरी पाटी ते लिंगदरी रोडवर बरडा पाटी जवळ दि.४ मार्च गुरुवार रोजी एका २६ वर्षीय युवकाचा बराशीत संशयास्पद मृत्युदेह आढळला होता.या प्रकरणी सेनगांव पोलीसात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली होती.नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत्युदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार केला होता.अखेर आज दि.०५ मार्च शुक्रवार रोजी दुपारी दिड वाजता सेनगांव पोलीसात दोन सख्या भावासह ५ आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील लिंगदरी पाटी ते लिंगदरी रोडवर बरडा पाटी जवळ रोडलगत एका बराशीत राहुल धर्मा जाधव वय २६ रा.लिंगदरी ता.सेनगांव या तरुणाचा मृत्युदेह संशयास्पद स्थितीत आढळुन आला व रोडवर त्याची दुचाकी देखील आढळुन आली होती.सेनगांव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृत्युदेह सेनगांव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला मात्र मृत्युदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी ताब्यात न घेता याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्या नंतरच मृत्युदेह ताब्यात घेण्याचा निर्धार केला होता.
पोलीसाकडुन मिळालेली माहीती अशी की, लिंगदरी येथील राहुल धर्मा जाधव (२६) हा सेनगांव येथील बाळु उटकर याच्याकडे मटक्याच्या बुकीवर रोजंदारीवर काम करीत होता हे बाळु उटकर याचे भाऊ आरोपी गजानन उटकर व सुनिल उटकर यांना खटकत होती.
दि.३ मार्च रोजी मयत राहुल जाधव हा बाळु उटकर याला कोरोना झाल्यामुळे हिंगोली येथे काँरंटाईन असल्याने आरोपी सोबत भेटण्यासाठी हिंगोली येथे गेला आरोपीतांनी संगणमताने आमच्या ऐवजी दुसरीकडेच मटका उताराचे काम का? करतोस या कारणावरुन कोणत्या तरी धार धार शस्त्राने मयत राहुल जाधवच्या डोक्यात,उजव्या पायावर,उजव्या हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारले म्हणुन सेनगांव पोलीस स्टेशनला मयताचा भाऊ कृष्णा धर्मा जाधव रा.लिंगदरी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी गजानन उटकर,सुनिल उटकर सोबत जावेद पठाण,बाळु पंडीत व सोहेल उर्फे सोनु सर्व रा.सेनगांव यांच्यावर गु.र.नं.६८/२०२१ कलम ३०२,३४ भादवि नूसार गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.


