प्रतिनिधी ! मोहन शेगर,
सोनई : साहित्य क्षेत्रातील सोनेरी नाव नाथामास्तर घोडेगांवकर यांचा (23/3/2021) स्मृतीदिन जगाचा निरोप घेऊन सहा वर्ष झाली उमललेल्या फुलाच निर्माल्य व्हाव सुगंध मात्र अंतःकरणात दरवळत रहावा तशा आठवणी आजही सतेज आहेत,
आई -भागीरथी, वडील- आबाजी वैरागर यांनी शाळेत नाव घातल. नाथा आबाजी वैरागर जन्म तारीख 66 मास्तर तुम्हीच लिहा. आम्ही आडाणी... तारीख आठवत नाही. 99 मास्तरान तारीख लिहिली 1/6/1939, कैक पिढ्यात कोणी शिकलं नाही. पण नाथामास्तर तथा दादा शिकले तेही वसतीगृहात आयुष्याशी संघष॔ केला.
शिक्षक, साहित्यिक, मास्तर हा सगळा प्रवास मनमोहक.., अविस्मरणीय. जे लिहिलं ते चिरकाल, ज्या शब्दांना स्पर्श झाला त्या शब्दांच सोनं झालं. आणि साहित्याच्या क्षितीजावर "नाथामास्तर घोडेगांवकर" हे नाव झळकत राहील.
प्रत्येक, कथा, कविता, कादंबरी, वगनाट्य यात जिव ओतुन सजीव केलं, जिवन प्रवास संपला, साहित्य प्रवास मागे राहीला. 66 बर्फातून उठला, सैतान दरी डोंगरी घालतो घाव.., सोडा मावळ्यांनो घोडे भरधाव.., 99 किंवा 66 प्रणयाची आसवे पत्थरात भिजली, तो सलिम राजपुत्र नर्तकी अनारकली.. 99 हे त्यांच काव्य पुर्ण लिहुन घ्यायच होत पण त्यांच्या निधनाने राहुन गेलं यांची मनोमन खंत आहे.
आयुष्यात शिक्षक म्हणून शिकविणारा गुरुजी आणि मास्तर म्हणून तमाशाला वगनाट्य देणारा लेखक दोन्ही वेगवेगळया भुमिका पण सामर्थ्य मात्र सारखंच. स्वतःच आयुष्य घडविल.. तमाशाचे लेखक पण घरात तमाशाचा विषय कधी आणला नाही. तमाशा क्षेत्रात त्यांच्या नावावर अनेक विक्रम झाले. पण तमाशा क्षेत्र उपेक्षित असल्याने नाथामास्तर घोडेगांवकर या नावाला शासकीय दरबारी वेगळी ओळख मिळाली नाही., ही खंत आहे.
आयुष्यात सार सुरळीत होत त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी त्यांचा आयुष्य सहवास महत्वाचं असताना 23/3/2015 या काळ रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 'उद्या मी नसेन पण तुझात मी असेन 'आस सांगणारे दादा सोबत काहीच घेऊन गेले नाहीत. पण स्वःता जवळच सार काही देऊन गेले. शिष्याकडुन गुरूदक्षिणा घेतली जाते पण मुलाला त्यांनी गुरूदक्षिणा कधी मागितली नाही. महारथी कर्णाचे "कवचकुंडलाच दान " हे वाचलं आणि ऐकलं पण उपेक्षित कुटुंबात जन्मलेल्या नाथामास्तर घोडेगांवकर यांची साहित्य क्षेत्रातील कवचकुडलं मात्र पाहीली, अनुभवली.
बाप गेल्यावर मुलं पोरकी होतात तेव्हा जगातली कोणतीही छत्री लागणारं उन रोखु शकत नाही...!
आज अनेक माणसं दिसतात पण दादा दिसत नाहीत. ते जिथं आहेत तिथ सुखात रहावेत दुखात हाक मारल्यानंतर 66 "भिऊ नकोस मी पाठीशी आहे." 99 असा प्रतिसाद यावा तो प्रतिसाद समाज व्यवस्थेशी लढण्याच बळ देईल. 66 तुमच दिसणं हा भास आहे. तुमच्या सावलीची आता आस आहे.99स्मृतिदिनानिमित्त दादाच्या पवित्र स्मृतींना शतशः विनम्र अभिवादन
शब्दांकन आणी लेखक
( श्री. सुधीर नाथा वैरागर )
मुलगा

