इंदापूर तहसील कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन
इंदापूर प्रतिनिधी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते,असे लेखी पत्र मुंबईचे माजी पोलीस पोलीस आयुक्त सिंग यांनी केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. रविवारी (दि.21) रोजी संपूर्ण राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी कडून निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान इंदापूर मध्येही भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचे दिसून आले.
इंदापूर तहसील कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करित अनिल देशमुख खुर्ची खाली करो,महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करित आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार वायकर यांकडे दिले.यावेळी इंदापूर भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, तानाजीराव थोरात,माऊली चवरे,राम आसबे,गजानन वाकसे,सचिन सावंत,ललेंद्र शिंदे,इम्रानखान जमादार,प्रेमकुमार जगताप,नानासाहेब गोसावी शिवाजी तरंगे,सतिष भोसले,विलास माने,लालासाहेब सपकळ,अविनाश कोतमिरे,शहाजी शिंदे,युवराज मस्के,राजेंद्र पवार,शितलताई साबळे आदी उपस्थितीत होते.

