श्रीरामपूर । प्रतिनिधी :
आज महाशिवरात्रीच्या दिनी महा शिवभक्त एकलव्य यांची जयंती भारत भर साजरी केली जाते.
एकलव्य एक वचनी,दानशूर व धनुर्धारी निपून असा पृथ्वी वरील एकमेव सर्वश्रेष्ठ योध्दा होता. गुरू द्रोणाचार्य यांचा तो परमभक्त व शिष्य होता. गुरू द्रोणाचार्य याने गुरूदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागितला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आणि यापुढे आंगठा नसल्याने सर्व श्रेष्ठ धनुर्धारी आता असणार नाही याची जाणीव असतानाही त्याने गुरुदक्षिणा म्हणून कुठलाही स्वार्थ न ठेवता स्वतःचा उजवा अंगठा धार धार बाणाने तोडून काढुन दिला. असा उल्लेख महाभारतात व इतर अनेक ग्रंथांत आढळतो. म्हणूनच एकलव्याचे नाव अजरामर झाले.
असा शिष्य कधी झाला ही नाही आणि होणारही नाही. असा महान एकमेव शिष्य एकलव्य यांची जयंती.आज वडाळा महादेव येथे भिल्ल समाज बांधव व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मोठया उत्साहाने एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच दादासाहेब झिंज,माजी उपसरपंच सुनिल कुदळे , योगेश पवार , बापू पवार , शिवाजी भालेराव सर, विजय भालेराव , राजू भालेराव, यशवंत जेठे, सुनिल जोर्वेकर, भरत पवार , रोहिदास भालेराव, उमेश पवार, अजय भालेराव, तसेच सर्व भिल्ल समाज बांधव उपस्थित होते.

