मोर्शी - राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती अंतर्गत उपपथक मोर्शी (उपजिल्हा रुग्णालय) येथे दि.10/03/2021 रोजी हत्तीरोग नियंत्रणासाठी विकृती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाय व किट वाटप कार्यक्रम अमरावती जिल्ह्याचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथून आज करण्यात आले.यावेळी 15 हत्तीरुग्णांना किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रवीण चकुले, दिनेश भगत, बी.एस.वावरे आरोग्य सहायक सुधाकर चोपकर, तांत्रिक विभागाचे प्रकाश दातीर, किटक समारक तराळ हे उपस्थित होते.
हत्तीरुग्णांना उपयोगी असणारे टफ, मग, डेटॉल, नॅपकिन, कॉटन रोल, पावडर, आयोडीन क्रीम इत्यादी साहित्य सदर किटमध्ये असून ह्या किट जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हत्तीरोग कार्यालयास प्राप्त झाल्या असून आज कार्यक्रमाचा शुभारंभ मोर्शी उपपथकात करण्यात आला.
लवकरच 13 हत्तीरोग उपपथकात 1172 रुग्णांना ह्या किट वाटप करण्यात येणार आहे. हा शुभारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोर्शी उपपथकाचे आरोग्य सहायक विनायक नेवारे, विनय शेलुरे, आरोग्य कर्मचारी प्रकाश मंगळे, सुधाकर कडू, प्रशांत बेहरे, चंद्रसेन जाधव, राहुल भोसले यांनी प्रयत्न केले व हत्तीरुग्णांना आरोग्य शिक्षण देऊन सदर किट कशी वापरावी याबद्दल सविस्तरपणे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन हे जिल्हा स्तरावरून श्री प्रविण चकुले, प्रकाश दातीर व सुधाकर चोपकर यांनी केले.

