देवळाली प्रवरा - दि. ११ मार्च देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या वतीने सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने आयोजित केंद्राचा ध्वज फडकवून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त RTO भाई संजय गोसावी साहेब, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा शिवसेना शहर अध्यक्ष सुनील कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगरसेविका संगीता चव्हाण, तान्हाजी वाळुंज, केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी विजया बहेनजी, राहुरी केंद्राच्या सह संचालिका ब्रम्हाकुमारी खुशी दीदी, रत्नमाला संसारे आदी.

