सध्या एक अध्यक्ष व एक सदस्यावर एमपीएससीचा कारभार सुरू - अंकिता पाटील..!!
एमपीएससीच्या परीक्षामध्ये शिस्त व पारदर्शकता हवी : अंकिता पाटील
इंदापूर प्रतिनिधी:आज पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा बाबत पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्ष कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांची भेट घेतली व परीक्षेच्या बाबतीतील समस्या मांडल्या.
अंकिता पाटील यावेळी म्हणाल्या की,
आज 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती परंतु सरकारने ऐनवेळी ही परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांचा विरोध- आक्रोश पाहून व आपण केलेली मागणी लक्षात घेता सरकारने ही परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याचे ठरवले आहे परंतु अनेक मुलांनी येण्या-जाण्यासाठी तसेच राहण्यासाठी बुकिंग ही केल्या होत्या ते आता त्यांना रद्द कराव्या लागल्या आहेत व जे कोणीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते, त्यांना 21 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.
सध्या एक अध्यक्ष व एक सदस्यावर एमपीएससीचा कारभार सुरू आहे, रिक्त असलेले चार सदस्यांची संख्या
भरली गेली तर एमपीएससी चा कारभार सुरळीत होईल. सध्या केवळ दोन सदस्यांना मुलाखती घ्यावा लागतात त्यामुळे नियुक्त त्यांना ही वेळ जातो व विलंब होतो. लवकरात लवकर या सर्व जागा भरल्या जाव्यात ही आमची मागणी आहे. अशी जाहीर मागणी अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी सरकार कडे केली आहे.

