shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकिंग न्यूज..! पिंपरी-चिंचवड शहरात नगरसेविकेच्या मुलाने स्वतःवर झाडली गोळी..!!


 पिंपरी चिंचवड:-नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवड गावात घडली.

प्रसन्न चिंचवडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न याने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. हा प्रकार रविवारी रात्री घडली. प्रसन्ना याला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. जखमी प्रसन्न हा नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे.
close