प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई : शनिशिंगणापूर, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे टू प्लस आरोपी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास टू प्लस यादीमधील 20 आरोपी पोलीस स्टेशन येथे हजर राहिले. हजर राहिलेल्या आरोपींचे इंन्ट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले आहेत, तसेच त्यांचे 5 वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेऊन त्यांचे फिंगर प्रिंट घेण्यात आले आहेत. आरोपी यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून योग्य ते मार्गदर्शन केले आहे.
सदर मेळाव्या करिता शिंगणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी सचिन बागुल, अंमलदार तसेच पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील उपस्थित होते.
शिंगणापुर पोलिस स्टेशनला टू प्लस आरोपी मेळाव्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल मार्गदर्शन करताना..!
सर्व आरोपी यांना भविष्यात चांगले वर्तन ठेवण्याबाबत सूचना देऊन त्यांचे हातून कोणताही गुन्हा घडणार नाही बाबत सूचना दिल्या व जर त्यांचे हातून यापुढे कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला तर त्यांचेवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. याबाबत त्यांना समज देण्यात आली आहे. मेळाव्या दरम्यान सोशल डिस्टसिंग ,मास्क,सॅनिटायझर चा वापर करणेत आला होता.

