shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापूरीतील जळीत गोठ्याच्या ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनी दिली भेट..!!

वडापूरीतील जळीत गोठ्याच्या ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनी दिली भेट..!!
इंदापूर प्रतिनिधी: वडापूरी येथील हनुमानवाडी याठिकाणी (दि ७ मार्च रोजी दुपारी जनावरांच्या गोठ्याला आग लागून चार जनावरे मृत्युमुखी पडले तर तीन  जखमी आहेत. त्यांच्यावर औषध उपचार चालू आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी घरी जाऊन भेट दिली गोविंद निंबाळकर यांची झालेल्या नुकसानीबद्दल विचारपूस केली. आणि तहसीलदार ठोंबरे यांना झालेल्या नुकसानीबद्दल ताबडतोब नुकसान भरपाई देण्यास सांगितले. यावेळी वडापुरी तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे ,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिंगळे, प्रकाश करगळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील पिंगळे, महेश देवकर, सोमनाथ पवार ,उमेश यादव आदी उपस्थित होते.
close