shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रसायनशास्ञाचे हे नवे प्रवाह शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करतील-रमेशराव आडसकर..!!


             
 केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- 
केज च्या बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात सौदी अरेबियाचे डॉ.वाल्मिक शिंदे व जोधपुर आयआयटीचे डॉ.रोहन एरंडे यांनी केली नव्या प्रवाहावर चर्चा


केज सारख्या ग्रामिण भागातुन या अॉन लाईन परिषदेमुळे बाहेरच्या देशातील शेती विषयक तंञज्ञानाची व रसायानिक खतांची माहिती झाल्यास आपल्या देशातील शेती विषयक रासायनिक खते,पाणी या मध्येही आमुलाग्र बदल करुन या सर्व प्रयोगशाळेतला अभ्यास थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन अंबा सहकारी साखरचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केले.ते केजच्या अॉन लाईन परिषदेचे उद्घाटन करतांना बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन शास्ञ विभागाचे डॉ.लांडे हे होते.


केज शहरातील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विभागातर्फे दिनांक 10 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय वर्च्युअल परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे आयोजन हे तीन विभागांमध्ये करण्यात आले सर्वप्रथम उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव व आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री रमेश रावजी आडसकर साहेब हे उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील, रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ . मच्छिंद्र लांडे सर हे उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जी. फावडे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ . अनिल किर्दंत यांनी केले . उद्घाटन प्रसंगी बोलताना लांडे सर म्हणाले की रसायनशास्त्रातील नवीन आव्हाने येऊ घातलेली आहेत त्यासाठी आपण कशा पद्धतीने सजग राहायला पाहिजे व त्यांचा सामना कसा केला पाहिजे. रसायनशास्त्रातील संशोधनाचा स्तर कशा पद्धतीने वाढवावा व त्या संशोधनाचा समाजोपयोगी उपयोग कसा करण्यात येईल यावर त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या तीन सत्रा पैकी प्रथम सत्रामध्ये प्रमुख वक्तेहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील रसायनशास्त्रातील प्राध्यापक डॉ. भास्कर साठे सर हे होते. या सत्रासाठी चेअरमन म्हणून जे. ई. एस. कॉलेज जालना येथील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. एस. आर. मिरगणे सर हे उपस्थित होते. 

डॉ. सा . प्रमुख वक्ते म्हणून किंग अब्दुल्ला विश्वविद्यालय सौदी अरेबिया येथील डॉ. वल्मिक शिंदे सर हे उपस्थित होते व त्यांच्यासोबत चेअरमन म्हणून बलभीम महाविद्यालय बीड, येथील रसायनशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ. संतोष उंद्रे सर हे उपस्थित होते. डॉक्टर शिंदे सरांनी गोल्ड कॅटॅलिस्ट वापरून विविध रासायनिक प्रक्रिया कशा करता येतील व त्याचे औषध निर्मिती मध्ये कसा उपयोग केला जातो याचे सविस्तर असे विश्लेषण केले. रसायनशास्त्रातील महत्व सांगताना त्यांनी सांगितले कि जशी बिना मुठीची तलवार असते व बिना आवाजाची घंटा असते तसेच बिना कॅटॅलिस्ट चे रसायनशास्त्र हा विषय होईल असे सांगुन शेवटी सेंद्रिय रसायनशास्त्रातील उच्च दर्जाचे संशोधन करून समाजोपयोगी त्याचा उपयोग कसा करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या शेवटच्या सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील केमिस्ट्री विभागातील प्राध्यापक डॉ. रोहन एरंडे सर हे उपस्थित होते व या सत्रासाठी चेअरमन म्हणून डॉ. सारिका जाधव मॅडम, रसायनशास्त्र विभाग, सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद, या उपस्थित होत्या. डॉ. रोहन एरंडे सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये औषधांची निर्मिती का आवश्यक आहे व ते कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयार करता येतील यावर चर्चा केली. एरंडे सरांनी त्यांची जी काही औषध निर्मिती केलेले आहेत त्यांचा कॅन्सर हा रोग बरा करण्यासाठी त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. 

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे व रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनिल किरदंत सर, डॉ. अनिल गायकवाड सर, डॉ. सुरेश कांबळे सर, डॉ. बालासाहेब शितोळे सर व डॉ. महादेव सुवर्णकार सर यांनी केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी तंत्रस्नेही डॉ. भंडे सर, डॉ. सरसरे सर, डॉ. बिडवे सर प्रा . हिर्वे सर , डॉ . माने व महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे  अनमोल सहकार्य लाभले.                     
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील राऊत सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या शेवटी या परिषदेमध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर वक्ते, विविध महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, विविध 520 प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी या सर्वांचे आभार प्राध्यापक डॉ. श्याम सरसरे सर यांनी केले.
close