shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समितीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन सादर...!!

शिक्षक समितीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन सादर...!!
मोहिमेतून महिला शिक्षिका ,गंभीर आजारी, ५० वर्षावरील शिक्षकांना वगळणार , शालेय परिसरातच काम देणार व  माध्यमिक शिक्षकांची मदत घेणार - प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे.

इंदापूर प्रतिनिधी:महसुल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अपाञ शिधापञिका शोध मोहिमेतून शिक्षकांना वगळण्यात यावे.अशा प्रकारचे निवेदन सर्वप्रथम शिक्षक समिती इंदापूर शाखेच्यावतीने प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.

      प्रसंगी शालेय कामकाजातील वर्षाअखेरची कामे , आॕनलाईन आॕफलाईन शिक्षण , कोरोना बाबतची कामे सुरू असून याकामातून महिला शिक्षिका , गंभीर आजारी शिक्षक,५० वर्षावरील शिक्षक यांना वगळून शाळेच्या परिसरात शोध मोहिमेचे काम देवून , माध्यमिक शिक्षकांना देखील सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी पदाधिकारी यांना दिले.याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

      प्रसंगी व्हा चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन किरण म्हेञे , सुनिल शिंदे , भारत ननवरे , सुनिल कोकाटे , नजीर शिकीलकर , सतिश खटके , बापू आदलिंग , वामन गायकवाड , संतोष भोसले , विनय मखरे , संतोष हेगडे , अरूण मस्तुद उपस्थित होते.

.
close