इंदापूर बारामती रस्त्याच्या साईट पट्ट्या भरा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करणार - नितीन शिंदे.
इंदापूर प्रतिनिधी: (दि.१८मार्च २०२१ )रोजी इंदापूरचे तालुका शिवसेना यांच्या वतीने उप. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांना एन. एच. ६६ इंदापूर बारामती रोडचे नुकतेच काम झाले असून ते काम केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने साईट पट्ट्या भरणे गरजेचे होते. साईट पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता एक ते दीड फूट उचलून आला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे .मागील दोन दिवसापूर्वी चार निरपराध लोकांना व दोन पशूंना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हाची तक्रार बांधकाम विभागाच्या मार्फत दाखल करण्यात यावी व त्वरित साईट पट्ट्या भरून घेण्यात याव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र व उग्र आंदोलन करू व त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असे पत्र उप
अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे (दि १८ मार्च) रोजी देण्यात असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.

