पिंपरी चिंचवड:-मुळा-मुठा नदितील वाढत्या जलपर्णीमुळे दापोडी,फुगेवाडी,कासरवाडी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून डेंगू,मलेरीया यांसारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. त्याची दखल घेत आज आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालयासमोर जलपर्णी तोरण बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आयुक्तांना निवेदन देऊन लवकर समस्या न सुटल्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
ह्यावेळी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, पिंपरी युवासेना विभागसंघटक निलेश हाके व मैत्री ग्रुप संस्थापक रविभाऊ कांबळे,अक्षय दादा गायकवाड,सचिन नहार,सतीश साळुंखे,आशिष जगताप,अभिजित जाधव,वैभव गायकवाड,शुभम कांबळे,राहूल बनसोडे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

