shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात पहाटेच्या सुमारास भीषण आग..!


पुणे:-पुण्यातील लष्कर परिसरात हे शिवाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये मटण चिकन आणि मासे विक्रीची आणि दुकाने आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अनेक दुकानांनी पेट घेतला.

दरम्यान याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. तोपर्यंत येथील दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. दुकानाच्या आत मध्ये असणाऱ्या कोंबड्या-बकऱ्या या देखील आगीमध्ये नष्ट झाल्या आहेत.

दरम्यान पहाटेची वेळ होती आणि येथील दुकानांमध्ये कोणी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा सकाळपासून हे मार्केट गजबजलेले असते. दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी शर्तीचे प्रयत्न करत तासाभराच्या प्रयत्ना नंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
close