shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खर्डेकराना निरोगी ठेवण्यासाठी आ.रोहित दादा पवार विचार मंचने उचलला स्वच्छतेचा विडा..!



सौ सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतुन खर्डा शहर स्वच्छ व चकचकीत  होणार 

खर्डा प्रतिनिधी :जामखेड तालुक्यातील खर्डा या ऐतिहासिक शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी आ.रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहेे.    

                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की .सुनंदाताई सौ पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथे आ.रोहितदादा पवार विचार मंच या माध्यमातून दिनाक २६ फेब्रु रोजी सामाजिक कार्यकर्ते  प्रा सचिन सर याच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आले .मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन स्वच्छते विषयी जनजागृती करत  आहे .  खर्डा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी  किमान आठवड्यातुन दोन दिवस प्रत्येक वार्डात  हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे .  प्रथमता खर्डा येथील सिताराम बाबांचा गड व देवीचे मंदिर स्वच्छ करण्यात आले होते .अंगारकी चतुर्थी या शुभ दिवशी खर्डा येथील श्रद्धा गणेश मंडळ परिसर तसेच सुतार नेट येथील मयूरेश्वर गणेश मंडळचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

खर्डा शहरात प्रथमच स्वच्छता अभियान होत असल्याने  स्वच्छता मंच चे कौतुक होत  आहे .स्वच्छता अभियान राबवित असताना  ग्रामस्थ  स्वतःहून हातात झाडू घेऊन  या स्वच्छता अभियानात सहभागी होत आहे.

यामध्ये स्वच्छतेच्या मोहिमेसाठी ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, सदस्या सुनीता जावळे ,निता पवार सह भीमराव घोडेराव, अवि सुरवसे ,गुरुराज पवार,दिपक जावळे,बापूसाहेब ढगे, विकास शिंदे व ग्रामस्थांनी  स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन  स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडत असल्याने   नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
close