shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रिकेट खेळून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी केले भिगवण येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन..!!

 क्रिकेट खेळून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी केले भिगवण येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन..!!
राजवर्धन पाटील यांच्या हस्ते समता प्रिमियर लीग स्व. रमेश (बापू )जाधव चषक २०२१ या फूल पीच क्रिकेट भव्य सामन्यांचे भिगवण येथे उद्घाटन संपन्न.


इंदापूर प्रतिनिधी: (दि. ६ मार्च  .२१) रोजी जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान भिगवण  येथे समता फाउंडेशन भिगवण,श्रीनाथ ग्रुप भिगवण, शिवतेज ग्रुप भिगवण आयोजित समता प्रिमीयर लीग स्व.रमेश (बापू) जाधव चषक- २०२१  फुल पीच क्रिकेट भव्य सामन्यांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला
या स्पर्धाचे आयोजन समता फाउंडेशन भिगवण,श्रीनाथ ग्रुप भिगवण, शिवतेज ग्रुप भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, क्रिकेट प्रेमी व खेळाडूंसाठी फूलपीच षटकार असणारी ही क्रिकेट स्पर्धा अनेकांना निख्खळ आनंद देणारी असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५५५५ व चषकद्वितीय पारितोषिक ३३३३३ व चषक  तृतीय पारितोषिक २२२२२व चषक  आणि चतुर्थ पारितोषिक १११११ व चषक चषक सौजन्य रणजीत (आण्णा) जाधव यांचे लाभले आहे. 
आयोजक सत्यवान भोसले,प्रताप भोसले, सुधिर भोसले,अमोल भोसले , रोहन देहाडे,स्मेश मोतीकर,नरेंद्र शिंदे, अक्षय बनसोडे,अभी भरणे, अभिजीत गाणबोटे,शुभम भोसले, धीरज गायकवाड,सुरज भोसले, योगेश भोसले, अक्षय भोसले, गणेश गायकवाड, कृष्णा भोसले, प्रशांत मोतिकर,सागर देहाडे,सनी मोरे,सोहन देहाड़े,प्रेम जगताप, विशाल लोंढे,प्रमोद लोंढे,रोहन निकाळजे व इतर आयोजकांनी या सामन्यांसाठी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचे यावेळी दादांनी कौतुक करत सामने यशस्वी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व बक्षीस दिलेल्या संस्थाचे व प्रतिष्ठित मंडळीचे यावेळी मनःपूर्वक आभार मानले. व क्रिकेट खेळून सामन्याचे उद्घाटन केले.

निरा भिमा सहकारी साखर  कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांचा वाढता जनसंपर्क हा तालुक्यातील तरुणांमधील एक आकर्षण ठरत आहे. तसेच तरुणांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष नोंदवलेल्या सहभागाने  राजवर्धन पाटील व त्यांच्या हातून झालेल्या प्रत्येक कृती लोकप्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहेत. आज त्यांनी प्रत्यक्ष क्रिकेट खेळून सामन्याची उद्घाटन केले. ही बाब तरुणांसाठी आकर्षनाची असल्याचे यावेळी दिसून आली. 
close