shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मार्च महिन्याच्या या लसीकरण टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन लस घ्यावी- अंकिता पाटील..!!

मार्च महिन्याच्या या लसीकरण टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांनी  सहभागी होऊन लस घ्यावी- अंकिता पाटील


   
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेतील लसीकरण केंद्रास भेट देऊन आढावा घेतला.बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि ज्यांचे वय ४५ ते ५९ च्या दरम्यान आहे, मात्र इतर आजार असलेल्या सर्व नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात झाली आहे. या चालू असलेल्या लसीकरण मोहिमेला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कपिलकुमार वाघमारे उपस्थित होते.

   
कोरोना पादुर्भावामुळे संपूर्ण जगावर तसेच भारत देशावर संकट निर्माण झाले होते कोरोना पार्श्वभूमीवर भारतीय शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून लस विकसित केली असून भारत सरकारने नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली आहे. लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असणाऱ्या वय वर्ष ४५ ते ५९ च्या नागरिकांना लस दिली जात आहे.
   
जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कोविड लसीकरण केंद्रास भेट देवून आढावा घेतला. लसीकरणासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सूचना केल्या.
close